Type Here to Get Search Results !

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना! पुरुष व्यवसायिक विभागात मध्य रेल्वे वि. रचना नोटरी व पश्चिम रेल्वे वि महाराष्ट्र पोस्ट उपांत्य फेरीत भिडणार महिला व्यवसायिक विभागात पश्चिम रेल्वे वि महावितरण व रचना नोटरी वि. मुंबई पोलीस उपांत्य फेरीत लढणार ​मुंबईच्या लाल मातीत रंगला अटीतटीचा संघर्ष प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत विजयी संघांची उपांत्य फेरीत दिमाखदार एन्ट्री ​

 



विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा

महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना!

पुरुष व्यवसायिक विभागात मध्य रेल्वे वि. रचना नोटरी व पश्चिम रेल्वे वि महाराष्ट्र पोस्ट उपांत्य फेरीत भिडणार

महिला व्यवसायिक विभागात पश्चिम रेल्वे वि महावितरण व रचना नोटरी वि. मुंबई पोलीस उपांत्य फेरीत लढणार     

मुंबईच्या लाल मातीत रंगला अटीतटीचा संघर्ष

प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत विजयी संघांची उपांत्य फेरीत दिमाखदार एन्ट्री

मुंबई (क्री. प्र.) : मुंबईच्या लाल मातीत खेळाडूंच्या वेगवान हालचालींनी, अचूक चढायांनी आणि शेवटच्या सेकंदापर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतींनी अक्षरशः मैदान पेटवून दिले. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि विद्यार्थी क्रीडा केंद्र यांच्या आयोजनाखाली सुरु झालेल्या ६२ व्या जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत आज जिद्द, चपळता आणि विजयाची भूक यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळ या संघांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत दिमाखात विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली.

 


उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट – पुढील लढतींकडे सर्वांचे लक्ष

या निकालांनंतर पुरुष व्यावसायिक विभागात मध्य रेल्वे वि. रचना नोटरी आणि पश्चिम रेल्वे वि. महाराष्ट्र पोस्ट, तर महिला व्यावसायिक विभागात पश्चिम रेल्वे वि. महावितरण आणि रचना नोटरी वि. मुंबई पोलीस या उपांत्य फेरीतील लढती निश्चित झाल्या आहेत.

 


महाराष्ट्र पोस्टचा थरारक विजय – बँक ऑफ इंडियाची कडवी झुंज

व्यावसायिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र पोस्टने बँक ऑफ इंडिया संघावर १७-१५ असा अवघ्या २ गुणांनी आणि केवळ १० सेकंद शिल्लक असताना अत्यंत रोमांचक विजय मिळवला. महाराष्ट्र पोस्टकडून अक्षय मासाळ (२, १:१० मि. संरक्षण), लक्ष्मण गवस (१:१० व १:४० मि. संरक्षण), आकाश साळवे (१:३० मि. संरक्षण व १ गुण), प्रतीक देवरे (१:३० मि. संरक्षण व १ गुण), शुभम शिंदे (५ गुण), आशितोष पवार (४ गुण), शुभम उत्तेकर (१:२०, १:२० मि. संरक्षण व १ गुण) यांनी विजयात निर्णायक योगदान दिले. पराभूत बँक ऑफ इंडियाकडून सुजल जायगडे (२:२० मि. संरक्षण व १ गुण), हर्ष कामतेकर (१ मि. संरक्षण व ४ गुण), रामचंद्र झोरे (१:३०, १:५० मि. संरक्षण व ३ गुण), जनार्दन सावंत (१:१० व १:४० मि. संरक्षण) यांनी शेवटपर्यंत झुंज दिली.

 


पश्चिम रेल्वेचा डावाने विजय – मुंबई पोलीस नामोहरम

दुसऱ्या सामन्यात पश्चिम रेल्वेने आक्रमक खेळ करत मुंबई पोलीस संघावर १०-८ असा एक डाव व २ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. पश्चिम रेल्वेकडून राहुल मंडल (१:५० मि. संरक्षण व २ गुण), महेश शिंदे (१:३० मि. संरक्षण व २ गुण), प्रसाद राड्ये (२:३० मि. संरक्षण), विजय शिंदे (१:३० मि. संरक्षण व २ गुण), अमित पाटील (३:२० मि. संरक्षण व १ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी करत संघाचा दबदबा निर्माण केला. पराभूत मुंबई पोलीसकडून आकाश खापरे (१:२० मि. संरक्षण), प्रदीप जाधव (१:२० मि. संरक्षण), हर्ष मोरे (१ मि. संरक्षण), सोहेल शेख (४ गुण) यांनी लढत दिली.

 


४ फूट ११ इंच गट – ओम साईश्वरचा एकतर्फी विजय

४ फूट ११ इंच गटातील सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिर संघावर १०-४ असा एक डाव व ६ गुणांनी दणदणीत विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. ओम साईश्वरकडून श्लोक जाधव (४ मि. संरक्षण), कार्तिक गामी (नाबाद ४ मि. संरक्षण व २ गुण), आरव साटम (२:२० मि. संरक्षण व १ गुण), अधिराज गुरव (१:३० मि. संरक्षण व ५ गुण), शंतनू रावराणे (१:१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी मैदानावर वर्चस्व गाजवले. पराभूत श्री समर्थ संघाकडून कृशाल वाघधरे (२ मि. संरक्षण), अद्वैत हडकर (१:५० मि. संरक्षण), सार्थ वायंगणकर (१ मि. संरक्षण व १ गुण) यांनी प्रतिकार केला.


Post a Comment

0 Comments