‘महाराष्ट्र केसरी’चा जल्लोष सुरू!
६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
पुणे : महाराष्ट्राच्या पारंपरिक क्रीडेला नवा उत्साह देणारा क्षण
मुंबईत रंगला! ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो)
अनावरण आणि मानाच्या गदेचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
उत्साहात पार पडले. वाघोली, पुणे येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या तयारीला
आता अधिकृत सुरुवात झाली असून राज्यातील मल्लांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली
आहे.
वर्षा निवासस्थानी रंगला बोधचिन्ह अनावरण सोहळा
मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची
सविस्तर माहिती घेतली. स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक करत
यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
कुस्तीच्या परंपरेला अधिक बळ देणारी ही स्पर्धा राज्यातील
क्रीडाप्रेमींसाठी मोठा उत्सव ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
१८ ते २२ मार्चदरम्यान वाघोलीत कुस्तीचा महोत्सव
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आयोजक
रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने ही प्रतिष्ठेची स्पर्धा १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत वाघोली (पुणे) येथे रंगणार आहे. राज्यभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत
दमदार झुंज देणार असून महाराष्ट्र केसरी किताबासाठी अटीतटीची लढत
पाहायला मिळणार आहे.
विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी
यंदाच्या स्पर्धेचा विजेता ठरणाऱ्या मल्लाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते मानाची गदा आणि ‘फॉर्च्युनर’ गाडी देऊन गौरव
करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या समारोप सोहळ्यास
मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित राहणार असल्याचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे
उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस पै. योगेश दोडके,
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे
अध्यक्ष मेघराज कटके, नगरसेवक अनिल सातव पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव संजय शेटे,
तसेच नटराज सातव पाटील, सुनील (चाचा) जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ मानाची गदा
मुळशीतील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ
महाराष्ट्र केसरी विजेत्यास मानाची गदा देण्याची परंपरा कायम ठेवली जाते. यंदाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
यांच्या वतीने ही मानाची गदा दिली जाणार आहे. कुस्तीला
लोकप्रियता आणि सर्वमान्यता मिळवून देण्यासाठी स्पर्धा अधिक दर्जेदार होणे आवश्यक
असल्याचे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘मानाची गदा’ पूजन
‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील
‘मानाची गदा’ पूजण्यात आली. “कुस्ती ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. अशा प्रतिष्ठित
स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील मल्लांना मोठे व्यासपीठ मिळते,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments