मुंबईत राज्य मानांकन कॅरम
स्पर्धेचा थरार!
१३ ते १५ मार्चदरम्यान श्रमिक
जिमखान्यावर राज्यातील २३४ खेळाडूंचा कॅरम संग्राम
प्रशांत मोरे व समृद्धी घाडिगावकर
प्रथम मानांकित
मुंबई : कॅरमच्या पटावर राज्यातील अव्वल
खेळाडूंचा थरार अनुभवण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना लाभणार आहे.
महाराष्ट्र
कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन
यांच्या मान्यतेने
शिवशंकर
उत्सव मंडळातर्फे आयोजित दुसरी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
दिनांक १३ ते १५ मार्च २०२६
दरम्यान श्रमिक जिमखाना,
ना. म. जोशी मार्ग, मुंबई येथे रंगणार आहे. राज्यभरातील
अव्वल कॅरमपटूंच्या उपस्थितीत होणाऱ्या या स्पर्धेत कौशल्य,
अचूकता आणि मानसिक एकाग्रतेची खरी
कसोटी लागणार आहे.
पहिल्या दिवशी दुपारी ३ वाजता
स्पर्धेला प्रारंभ
स्पर्धेची सुरुवात
१३ मार्च
२०२६ रोजी दुपारी ३ वाजता पुरुष एकेरी गटाच्या सामन्यांनी
होणार आहे. पुरुष व महिला एकेरी गट
मिळून एकूण २३४ खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग
नोंदवला आहे. विजेत्यांना एकूण ₹१,१०,००० रोख पारितोषिके आणि आकर्षक चषक
देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष
म्हणजे या स्पर्धेतील सामने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या
युट्युब चॅनलवर थेट प्रक्षेपित केले जाणार असून
किशोर
वागळे हे मराठी,
हिंदी व इंग्रजी भाषेतून समालोचन करणार आहेत.
अनुभवी पंचांची नियुक्ती
स्पर्धेचे संचालन दर्जेदार पातळीवर
पार पाडण्यासाठी अनुभवी पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकार
व रमेश चव्हाण
हे प्रमुख पंच म्हणून काम पाहणार
आहेत,
तर आंतरराष्ट्रीय पंच अजित सावंत
हे तांत्रिक संचालक
म्हणून स्पर्धेचे तांत्रिक
मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवामुळे सामने अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक
पद्धतीने पार पडणार आहेत.
पुरुष गटात प्रशांत मोरे प्रथम
मानांकित
पुरुष एकेरी गटात
मुंबईच्या
विश्वविजेत्या कॅरमपटू प्रशांत मोरे यांना प्रथम मानांकन
देण्यात आले आहे. त्यांच्या
पाठोपाठ २) झैद अहमद फारुकी (ठाणे),
३) सागर वाघमारे (पुणे), ४) विकास धारिया (मुंबई),
५) अभिजित त्रिपनकर (पुणे), ६) सिद्धांत वाडवलकर (मुंबई),
७) संदीप दिवे (जळगाव), ८) प्रफुल मोरे (मुंबई)
यांना मानांकन मिळाले आहे. या सर्व
खेळाडूंमुळे पुरुष गटात चुरशीचे सामने अपेक्षित आहेत.
महिला गटात समृद्धी घाडिगावकर
अव्वल
महिला एकेरी गटात
ठाण्याच्या
समृद्धी घाडिगावकर यांनी प्रथम मानांकन
पटकावले आहे. त्यानंतर
२)
आकांक्षा कदम (रत्नागिरी), ३) अंबिका हरिथ (मुंबई),
४) मिताली पाठक (मुंबई), ५) रिंकी कुमारी (मुंबई),
६) प्राजक्ता नारायणकार (मुंबई उपनगर), ७) सोनाली कुमारी (मुंबई),
८) चैताली सुवारे (ठाणे) या खेळाडूंना मानांकन देण्यात आले
आहे. महिला गटातही दर्जेदार आणि तितक्याच रंगतदार लढती अपेक्षित आहेत.
कॅरम संस्कृती जपण्याचा उद्देश
या स्पर्धेच्या माध्यमातून कॅरम
खेळाची समृद्ध परंपरा जपणे आणि युवकांमध्ये खेळाबद्दलची आवड निर्माण करणे हा
आयोजकांचा मुख्य हेतू आहे. मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे,
चिटणीस प्रविण चौधरी आणि क्रीडा प्रमुख मिलिंद परब यांनी सर्व कॅरमपटू आणि
क्रीडाप्रेमींना आवाहन करत सांगितले की, “ही स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नाही,
तर कॅरमचा आनंद, मैत्री आणि क्रीडाभाव
अनुभवण्यासाठी आहे. सर्व खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
कॅरमप्रेमींसाठी पर्वणी
तीन दिवस चालणाऱ्या या भव्य
स्पर्धेमुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण होणार असून राज्यभरातील खेळाडूंच्या
सहभागामुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढणार आहे. कॅरमप्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे
कौशल्य,
एकाग्रता आणि खेळाडूवृत्तीचा सुंदर संगम अनुभवण्याची पर्वणी
ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments