५० वी सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा मुंबईत
रंगणार!
दादरच्या एमसीए ट्रेनिंग सेंटरवर लहानग्या कॅरमपटूंचा जल्लोष
राज्यभरातून
सहभागाची उत्सुकता
कॅरमच्या नवोदित ताऱ्यांचा महामेळावा
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कॅरमच्या सोंगट्यांचा थरार अनुभवायला मिळणार असून
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे
आयोजित ५० वी सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा
ही स्पर्धा येत्या २६ मार्च २०२६ रोजी दादर येथील एमसीए ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट येथे रंगणार आहे. राज्यभरातील लहानग्या कॅरमपटूंना आपले
कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याने स्पर्धेबाबत प्रचंड उत्साहाचे
वातावरण निर्माण झाले आहे.
४ गटांत होणार चुरस
या स्पर्धेत १२ वर्षांखालील मुले व मुली (कॅडेट)
आणि १४ वर्षांखालील मुले व मुली (सब ज्युनियर)
अशा एकूण ४ गटांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक गटात राज्यातील विविध
जिल्ह्यांमधून सर्वोत्तम खेळाडू सहभागी होणार असल्याने स्पर्धा अत्यंत रंगतदार
होण्याची चिन्हे आहेत.
प्रवेश नियम व संधी
प्रत्येक जिल्ह्यातून १२ वर्षांखालील गटात २ मुले व २ मुली,
तर १४ वर्षांखालील गटात ६ मुले व ६ मुली
यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना
राज्यस्तरीय स्पर्धेत चमक दाखवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
नोंदणीची अंतिम मुदत व अर्ज प्रक्रिया
स्पर्धेसाठी नावे नोंदवण्याची अंतिम मुदत
१८ मार्च २०२६
निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक खेळाडूंनी
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या
अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावेत. तसेच शिवाजी पार्क, मुंबई येथील पारेख महल बिल्डिंग (आश्रय हॉटेलच्या मागे)
येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संलग्न जिल्हा संघटनेमार्फत नावे स्वीकारली जाणार
आहेत.
विजेत्यांना आकर्षक पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे राज्यातील कॅरम
खेळाची पायाभरणी अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून भविष्यातील आंतरराष्ट्रीय
कॅरमपटू घडविण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments