रामचंद्रन स्मृती राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा २६
मार्चपासून
२.६८ लाख रुपयांची बक्षिसे
राज्यातील अव्वल
खेळाडूंचा सहभाग अपेक्षित
मुंबई : बॅडमिंटनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मुंबईत येत्या
२६ ते २९ मार्च २०२६
दरम्यान रंगणार असलेल्या योनेक्स सनराइज मनोज रामचंद्रन स्मृती राज्य खुल्या
बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत २.६८ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि पदुकोण शटलर्स अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या
स्पर्धेत राज्यातील अव्वल खेळाडू सहभागी होणार असल्याने स्पर्धेची रंगत अधिक वाढणार आहे.
मुंबईतील दोन प्रमुख कोर्टवर सामने
ही स्पर्धा ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात येत असून स्पर्धेतील
सामने नॉर्थ
इंडियन असोसिएशन आणि माटुंगा जिमखाना येथील कोर्टवर खेळवले जाणार आहेत. उत्कृष्ट सुविधांनी
सुसज्ज अशा या कोर्टवर राज्यातील नामांकित खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी
सज्ज झाले आहेत.
पुरुष व महिला एकेरी विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे
स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरी गटांचा समावेश असून विजेत्यांना प्रत्येकी ४१,००० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. उपविजेत्यांना
प्रत्येकी ३१,००० रुपये, तर तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे
२१,००० आणि ११,००० रुपये रोख बक्षिसे मिळणार आहेत.
१५ वर्षांखालील गटासाठी विशेष बक्षिसे
१५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटासाठीही आकर्षक
बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या गटातील विजेत्याला ८,५०० रुपये, उपविजेत्याला ५,५०० रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ३,५०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या गटासाठीची बक्षिसे
संदीप ठाकर
यांनी त्यांच्या मुलगा निहार ठाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रायोजित केली आहेत.
११ वर्षांखालील गटातील खेळाडूंनाही प्रोत्साहन
११ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील
विजेत्यांना प्रत्येकी ६,००० रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. उपविजेत्यांना
४,००० रुपये, तर तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंना २,५०० रुपये बक्षीस देऊन उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येणार
आहे.
प्रवेशिकांसाठी २० मार्च अंतिम तारीख
या स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६
निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी
१,००० रुपये प्रवेश शुल्क असून प्रवेशिका www.mbasso.in या अधिकृत संकेतस्थळाद्वारेच स्वीकारल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
स्पर्धेबाबत अधिक माहिती हवी असल्यास संघटन सचिव जितेश पदुकोण यांच्याशी ९८२१०५१७९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

Post a Comment
0 Comments