अमित सप्रू, एस. अनंत, आदित्य अग्रवाल आणि आशित पंड्याची दमदार आगेकूच
सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत रंगले रोमांचक सामने
मुंबई : मुंबईतील प्रतिष्ठित **क्रिकेट क्लब ऑफ इंडिया
(सीसीआय)**च्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये
सुरू असलेल्या सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत चौथ्या फेरीतील सामन्यांनी प्रेक्षकांना रोमांचित
केले. अचूक पॉटिंग, संयमित खेळ आणि प्रभावी ब्रेक्सच्या जोरावर अमित सप्रू, एस. अनंत, आदित्य अग्रवाल आणि आशित पंड्या यांनी आपापले सामने जिंकत स्पर्धेच्या पाचव्या फेरीत दमदार प्रवेश केला.
अमित सप्रूची विवेक शहावर एकतर्फी मात
चौथ्या फेरीतील सामन्यात अमित सप्रूने
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विवेक शहावर
४-० (५८-५०,
६०-२६,
६४-१९,
६६-२२)
अशी एकतर्फी मात केली. सुरुवातीपासूनच आक्रमक आणि अचूक
पॉटिंग करत अमितने प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी न देता सामना आपल्या नावावर
केला.
एस. अनंतची सुनील जैनवर प्रभावी सरशी
दुसऱ्या एका लढतीत एस. अनंतने
सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर सुनील जैनवर
४-१ (६७-३८,
६६-३८,
२४-६०,
७७-३५,
७९-६१)
असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली. अनंतने महत्त्वाच्या
क्षणी अचूक पॉटिंग करत सामन्यावर आपली पकड कायम ठेवली.
आदित्य अग्रवालचा मयूर गर्गवर थरारक विजय
दिवसातील सर्वात चुरशीच्या सामन्यांपैकी एकात
आदित्य अग्रवालने मयूर गर्गवर
४-३ (२१-६८,
४५-५५,
७८(५५)-०,
७२-४९,
३८-६३,
६७-६०,
६८-२०)
असा थरारक विजय मिळवला. पहिल्या दोन फ्रेम गमावल्यानंतर
आदित्यने शानदार पुनरागमन करत निर्णायक क्षणी आपले कौशल्य दाखवले.
आशित पंड्याची विवेक नारायणवर झुंजार मात
तितक्याच रंगतदार सामन्यात आशित पंड्याने विवेक
नारायणला
४-३ (७०-३२,
५३-६६,
६७-३८,
४८-६१,
५६-४८,
६४-७४,
५७-१४)
असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. दोन्ही
खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली, मात्र शेवटच्या फ्रेममध्ये आशितने अचूक खेळ करत विजयावर
शिक्कामोर्तब केले.
रोहन कोठारे, पीटर पॉल आणि के. व्यंकटेशची विजयी आगेकूच
इतर सामन्यांत रोहन कोठारेने मितेश
ठक्करवर
४-२ (४३-५८,
५७-६४,
७७-५६,
६०-१०,
६५-२३,
७७-३४)
अशी मात केली. पीटर पॉलने
एजाज मर्चंटवर ४-२ (७०-३९, ५१-६१, ७-७३, ७४-६७, ७२-४७, ६०-५०) असा विजय मिळवला. के. व्यंकटेशने झेनुल
अर्सीवालावर
४-१ (७५-४६,
७२-६१,
५३-५१,
५९-६६,
६४-२४)
अशी सरशी केली.
आर. गिरीश आणि सुमीत सालदूरकरची प्रभावी कामगिरी
अन्य लढतीत आर. गिरीशने
सिद्धार्थ टेंबेवर ४-० (११०-१७, ६१-४९, ६४-२८, ५२-५१) अशी सहज मात केली. तसेच सुमीत सालदूरकरने नीलेश
संगरवर
४-० (७१-२३,
७७-२१,
६८-४८,
७५-१५)
असा दणदणीत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.
सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत दररोज रंगणाऱ्या अशा उच्च दर्जाच्या आणि रोमांचक
सामन्यांमुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली असून पुढील फेरीत आणखी थरारक सामने
पाहायला मिळण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


Post a Comment
0 Comments