चौथ्या प्रयत्नात गणेश पेडामकर ‘मुंबई श्री’
महिलांमध्ये रेखा शिंदे अव्वल
मालाड येथे रंगली शरीरसौष्ठवपटूंची चुरशीची स्पर्धा
धमाकेदार यशाचा क्षण
मुंबई :
शरीरसौष्ठवपटूंच्या स्वप्नातील आणि मानाच्या ‘मुंबई श्री’ किताबावर अखेर गणेश पेडामकर याने मोहोर उमटवली. बॉडी वर्कशॉप जिमचा हा पीळदार खेळाडू चौथ्या प्रयत्नात विजयी ठरत स्पर्धेचा
मानकरी ठरला. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि कठोर मेहनतीचे चीज करत
त्याने मुंबई
शरीरसौष्ठवातील ‘ऑस्कर’ मानल्या जाणाऱ्या ‘मुंबई श्री’ किताबावर कब्जा
केला. महिलांच्या गटात रेखा शिंदे हिने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला.
चौथ्या प्रयत्नात गाठले शिखर
गणेश पेडामकर याच्यासाठी हा विजय अत्यंत खास ठरला. यापूर्वी तो एकदा
गटविजेता तर एकदा कांस्यपदक विजेता ठरला होता; मात्र मुंबई श्रीचे जेतेपद त्याच्या हातातून निसटत होते.
अपयशाने खचून न जाता त्याने सातत्याने मेहनत सुरू ठेवली. अखेर
चौथ्या प्रयत्नात त्याच्या
चिकाटीला यश मिळाले आणि त्याने प्रतिष्ठेचा मुंबई श्री किताब पटकावला.
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्समध्ये सरशी
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या अंतिम फेरीत आठही गटविजेते रंगमंचावर उतरले असता
प्रेक्षकांचे लक्ष विशेषतः गणेश पेडामकर, मनीष वाघेला, अक्षय खोत आणि चेतन नाईक यांच्याकडे होते. या तगड्या स्पर्धेत गणेश पेडामकर याची उंची, संतुलित स्नायू आणि प्रभावी पोझिंग ठळकपणे उठून दिसली.
जजेसना प्रभावित करत त्याने मनीष वाघेला, अक्षय खोत आणि चेतन नाईक यांना मागे टाकत जेतेपद पटकावले.
मालाडमध्ये रंगली चुरशीची स्पर्धा
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना
यांच्या संयुक्त विद्यमाने मालाड येथील
पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यानात
ही प्रतिष्ठेची स्पर्धा उत्साहात पार पडली. मोठ्या संख्येने
खेळाडूंनी सहभाग घेतल्यामुळे प्रत्येक गटात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
गटविजेत्यांची निवड करताना परीक्षकांचाही कस लागला.
महिलांमध्ये रेखा शिंदेचे वर्चस्व
अलिकडच्या काळात महिलांमध्येही शरीरसौष्ठव आणि फिटनेसची आवड
वाढताना दिसत आहे. यंदाच्या स्पर्धेत बॉडी फिटनेस जिमच्या रेखा शिंदे हिने दमदार कामगिरी करत दुर्गा कुमारी आणि लविना नरोन्हा यांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या सशक्त
देहयष्टीने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
संघटनेच्या नियोजनाचे कौतुक
जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्ट आणि नगरसेवक अॅड. सिद्धांत शर्मा यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मोठ्या संख्येने स्पर्धक असूनही आयोजकांनी शिस्तबद्ध नियोजन करत स्पर्धा वेळेत
पूर्ण केली. पारितोषिक वितरण समारंभाला माजी खासदार गजानन कीर्तीकर,
आमदार अतुल भातखळकर,
नगरसेवक सिद्धांत
शर्मा, विजय
भोसले, अजय
खानविलकर, राजेश सावंत, किट्टी फनसेका, विशाल परब, सुनील शेगडे, भारत श्री शाम रहाटे, कुणाल केरकर, सचिन डोंगरे, प्रशांत कदम आदी उपस्थित होते. आयोजनासाठी अब्दुल मुकादम, राजेश निकम तसेच जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र श्रीसाठी मुंबई संघाची निवड
या स्पर्धेतून मुंबई आणि मुंबई उपनगर संघाची निवड
करण्यात आली असून हा संघ १५ मार्च २०२६ रोजी पनवेल येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र श्री’
स्पर्धेत सहभागी होणार आहे.
मुंबई श्री २०२५ स्पर्धेचा निकाल
५५ किलो : १.
राजेश तारवे
(शाहू जिम),
२. कीसन यादव (ए.व्ही. फिटनेस), ३. नीशांत नांदीवडेकर (श्री दत्तगुरु जिम), ४. रजीत बंगेरा (अदीअंश जिम), ५. नितीन शेगर (परब फिटनेस).
६० किलो : १.
प्रशांत घोलम
(आर्यन पॅराडाईज),
२. अक्षय गवाणे (पावर फिटनेस), ३. हसिबुल शेख (परब फिटनेस), ४. पवन विश्वकर्मा (बॉडी वर्कशॉप), ५. सिद्धांत लाड (परब फिटनेस).
६५ किलो : १.
निखिल सावंत
(आय.क्यू. फिटनेस),
२. संदीप सावळे (परब फिटनेस), ३. अरुण पाटील (सालम जिम), ४. स्टीफन राजा (परब फिटनेस), ५. सिद्धेश सुर्वे (परब फिटनेस).
७० किलो : १.
विशाल धावडे
(बालमित्र जिम),
२. संजय जाधव (आर.एम. भट व्यायामशाळा), ३. महेश पवार (सालम फिटनेस), ४. अनिल शिंदे (डी.एन. फिटनेस), ५. मयुर जगताप (माँ साहेब जिम).
७५ किलो : १.
मनीष वाघेला
(बालमित्र जिम),
२. विश्वंभर राऊळ (माँ साहेब जिम), ३. सुरेंद्र नाईक (परब फिटनेस), ४. नदिम अन्सारी (सावरकर जिम), ५. संदेश धाटावकर (बॉडी वर्कशॉप).
८० किलो : १.
गणेश पेडामकर
(बॉडी वर्कशॉप),
२. सिद्धांत यादव (आर्यन पॅराडाईज), ३. राजेंद्र जाधव (परब फिटनेस), ४. सौरभ म्हात्रे (आय.क्यू. फिटनेस), ५. फ्रान्सिस्को फर्नाडिस (सावरकर जिम).
८५ किलो : १.
अक्षय खोत
(परब फिटनेस), २. अमित साटम (माँ साहेब जिम), ३. ओमकार कळके (फिटनेस पॉईंट जिम), ४. सचिन कांबळे (स्टील बॉडी जिम), ५. आयुष तांडेल (परब फिटनेस).
८५ किलो वरील : १. चेतन
नाईक
(परब फिटनेस),
२. अविनाश शिंदे (परब फिटनेस), ३. क्षितिज साळुंके (आर्यन पॅराडाईज), ४. मनोज बोचरे (आर्यन पॅराडाईज), ५. अभिषेक लोढे (विशाल फिटनेस).
मेन्स फिजीक १७० सेमी : १. अनिकेत चव्हाण (प्राईम फिटनेस), २. अनिश शिंदे (डीएनए ३६० फिटनेस), ३. रोहन भोसले (बी. फिटनेस), ४. नितीन शेरेगर (परब फिटनेस), ५. अनिकेत पवार (आय.क्यू. फिटनेस).
मेन्स फिजीक १७० सेमी वरील : १. निलेश गुरव (माँ साहेब जिम), २. रेहमत खान (अदीअंश जिम), ३. असिफ खान (बॉडी वर्कशॉप), ४. अमोल कदम (सावरकर जिम), ५. रॉजर तावरो (बॉडी वर्कशॉप).
महिला शरीरसौष्ठव
१. रेखा शिंदे (बॉडी फिटनेस), २. दुर्गा कुमारी (परब फिटनेस), ३. लविना नरोन्हा (आय.क्यू. फिटनेस), ४. अपर्णा झगडे (आय.व्ही. फिटनेस), ५. पूजा चौटमल (माँ साहेब जिम).
किताब विजेता : गणेश पेडामकर (बॉडी वर्कशॉप)
उपविजेता : मनीष वाघेला (बालमित्र
जिम)




Post a Comment
0 Comments