Type Here to Get Search Results !

७२वी पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा ठाणे जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची रणधुमाळी १३२ पुरुष व ४२ महिला संघ मैदानात! ९ ते १७ मार्चदरम्यान कळवा येथील खारलँड मैदानावर ठाण्यात कबड्डीचा महासंग्राम विक्रमी संघांचा सहभाग

 


७२वी पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा ठाणे जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची रणधुमाळी

१३२ पुरुष व ४२ महिला संघ मैदानात!

९ ते १७ मार्चदरम्यान कळवा येथील खारलँड मैदानावर ठाण्यात कबड्डीचा महासंग्राम  

विक्रमी संघांचा सहभाग

 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कबड्डीचा मोठा जल्लोष रंगणार असून ७२वी पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेत तब्बल १३२ पुरुष संघ आणि ४२ महिला संघ सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही स्पर्धा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने आणि ऍडव्होकेट सौ. पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

 

कळवा येथील खारलँड मैदानावर रंगणार सामने

ही स्पर्धा कळवा, खारेगाव, ठाणे (प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कूलसमोरील मैदानावर सोमवार दि. ०९ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी ०५-०० ते ११-०० या वेळेत सामने खेळविण्यात येणार आहेत. अनेक दर्जेदार संघ सहभागी होत असल्याने या स्पर्धेत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

 

एक जिल्हा – एक संघ” संकल्पनेचा प्रभाव

राज्य कबड्डी संघटनेने पुन्हा एकदा एक जिल्हा – एक संघ” ही संकल्पना लागू केल्यामुळे यंदा पुरुष संघांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्वतःची क्षमता दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा

या स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष भरत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील कबड्डीला नवे व्यासपीठ मिळणार असून युवा खेळाडूंना स्वतःची प्रतिभा दाखवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

 

संघांना जिल्हा संघटनेचे आवाहन

स्पर्धेची भाग्यपत्रिका सर्व संबंधित संघांना पाठविण्यात आली आहे. ज्या संघांना ती अद्याप प्राप्त झालेली नाही त्यांनी जिल्हा संघटनेच्या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सचिव मालोजी भोसले यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केले आहे. तसेच सर्व सहभागी संघांनी दिलेल्या वेळेनुसार मैदानात उपस्थित राहून स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

 

जिल्ह्यातील कबड्डीला नवे बळ

या स्पर्धेमुळे ठाणे जिल्ह्यातील कबड्डीपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या संघांमुळे आगामी दिवसांत मैदानावर थरारक आणि दर्जेदार सामने पाहायला मिळणार आहेत. कबड्डीप्रेमींसाठी ही स्पर्धा एक खरा क्रीडा महोत्सव ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments