जेजे हॉस्पिटलचा विजयी जल्लोष
डीन डॉ. भंडारवार यांच्याकडून विशेष कौतुक!
आत्माराम मोरे स्मृती टी-२०
स्पर्धेत अजिंक्यपद
शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत ऐतिहासिक विजय
जेजे हॉस्पिटलची सुवर्ण कामगिरी
मुंबई : मुंबईतील
शिवाजी पार्क मैदानावर रंगलेल्या आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२०
क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटल संघाने थरारक लढतीत अजिंक्यपद पटकावत क्रिकेटप्रेमींची मने
जिंकली! शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात कर्णधार नरेश शिवतरकर यांनी चौकार ठोकत संघाला १५२ धावांचे लक्ष्य गाठून दिले आणि विजयी जल्लोषात संपूर्ण मैदान दुमदुमले.
डीन डॉ. अजय भंडारवार यांच्याकडून विशेष अभिनंदन
या ऐतिहासिक विजयाबद्दल डीन डॉ. अजय भंडारवार यांनी जेजे हॉस्पिटलच्या क्रिकेटपटूंचे विशेष कौतुक केले.
रुग्णसेवा आणि क्रीडा यांचा उत्तम समतोल साधत संघाने केलेल्या कामगिरीचे त्यांनी
कौतुक करत कर्णधार नरेश शिवतरकर व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी डॉ. संजय सुरासे, डॉ. अरुण पाटील, डॉ. अरुण राठोड यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
तारांकित खेळाडूंची दमदार उपस्थिती
या गौरव सोहळ्यात जेजे हॉस्पिटलचे अनेक खेळाडू उपस्थित
होते. त्यात राजेश शिवतरकर, सुभाष शिवगण, प्रकाश सोळंकी, अक्षय सावंत, जगदीश वाघेला, शैलेश वाघेला, अमोल वरेकर, रोहित सोळंकी, प्रवीण सोळंकी, हेमंत चाचीया, साभर मारू आदींचा समावेश होता. या सर्व खेळाडूंनी स्पर्धेत
सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला यश मिळवून दिले.
थरारक अंतिम सामना; डळमळीत सुरुवात ते विजयी शेवट
अंतिम सामन्यात जेजे हॉस्पिटल संघाची सुरुवात डळमळीत झाली होती. ६ बाद ५७ धावा अशी बिकट अवस्था असताना संघाने जबरदस्त पुनरागमन केले.
संयमी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्यांनी बलाढ्य ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध १५२ धावा गाठत अखेरच्या चेंडूवर विजय साकारला. हा विजय संघाच्या
जिद्दीचा आणि संघभावनेचा उत्तम नमुना ठरला.
स्पर्धेतील इतर संघांची कामगिरी
या स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल उपविजेते ठरले, तर लीलावती हॉस्पिटल आणि रहेजा हॉस्पिटल यांनी उपांत्य उपविजेतेपद मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत
केईएम हॉस्पिटल,
केडीए हॉस्पिटल-अंधेरी,
सोमैया हॉस्पिटल,
सेव्हन हिल्स हॉस्पिटल
यांनी चांगली कामगिरी केली. तसेच कस्तुरबा हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, किम्स हॉस्पिटल-ठाणे, केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई,
सायन हॉस्पिटल
यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावले.
स्पर्धेची रंगत; क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकादमी
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत १४ संघांनी सहभाग घेत दर्जेदार क्रिकेटचे दर्शन घडवले. जेजे
हॉस्पिटलच्या या ऐतिहासिक विजयामुळे स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक उंचावली असून,
रुग्णालयीन क्रिकेटमध्ये नव्या उंचीचा मानदंड निर्माण झाला
आहे.

Post a Comment
0 Comments