Type Here to Get Search Results !

बोरिवलीत रंगणार कॅरमचा महासंग्राम! एम.सी.एफ. राज्य मानांकन स्पर्धेसाठी दिग्गज सज्ज झैद अहमद फारुकी आणि समृद्धी घाडिगावकर अव्वल मानांकित; राज्यभरातील ३५८ खेळाडूंचा सहभाग एम.सी.एफ. स्पर्धेची रंगत शिगेला; महाराष्ट्रातील दिग्गजांची मांदियाळी

 


बोरिवलीत रंगणार कॅरमचा महासंग्राम! एम.सी.एफ. राज्य मानांकन स्पर्धेसाठी दिग्गज सज्ज
झैद अहमद फारुकी आणि समृद्धी घाडिगावकर अव्वल मानांकित; राज्यभरातील ३५८ खेळाडूंचा सहभाग

एम.सी.एफ. स्पर्धेची रंगत शिगेला; महाराष्ट्रातील दिग्गजांची मांदियाळी

 

मुंबई : बोरिवली (पश्चिम) येथील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्या वातानुकूलित हॉलमध्ये ११ वी एम.सी.एफ. राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या २३ ते २५ मे २०२६ दरम्यान रंगणार असून राज्यातील अव्वल कॅरमपटूंच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचा थरार कमालीचा वाढला आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात मिळून तब्बल ३५८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

 

झैद आणि समृद्धीला अव्वल मानांकन

स्पर्धेतील पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी अव्वल स्थान पटकावले आहे. पुरुष एकेरी गटात राज्य विजेता झैद अहमद फारुकी याला प्रथम मानांकन देण्यात आले असून महिला गटात राज्य विजेती समृद्धी घाडिगावकर हिला अव्वल मानांकन मिळाले आहे. अलीकडील राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे या दोघांवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

 

पुरुष गटात ३०२ खेळाडू; दिग्गजांमध्ये चुरस

पुरुष एकेरी गटात तब्बल ३०२ खेळाडूंनी सहभाग घेतला असून विजेतेपदासाठी जबरदस्त संघर्ष अपेक्षित आहे. मानांकनानुसार खेळाडू खालील प्रमाणे

१) झैद अहमद फारुकी (ठाणे), २) अभिजित त्रिपनकर (पुणे), ३) संदीप दिवे (जळगाव), ४) सौरभ मते (मुंबई), ५) प्रशांत मोरे (मुंबई), ६) रहीम खान (पुणे),
७) सागर वाघमारे (पुणे), ८) महम्मद घुफ्रान (मुंबई)

या दिग्गज खेळाडूंना मानांकन देण्यात आले आहे.

 

महिला गटातही स्टार खेळाडूंची उपस्थिती

महिला एकेरी गटात ५६ खेळाडूंनी सहभाग घेतला असून अनेक नामांकित खेळाडू विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.

महिला गटातील मानांकन पुढीलप्रमाणे

१) समृद्धी घाडिगावकर (ठाणे), २) श्रुती सोनावणे (पालघर), ३) निलम घोडके (मुंबई), ४) ऐशा साजिद खान (मुंबई), ५) प्राजक्ता नारायणकर (मुंबई), ६) रिंकी कुमारी (मुंबई), ७) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ८) चैताली सुवारे (ठाणे).

 

१.१० लाखांची पारितोषिके; थेट प्रक्षेपणाचीही सोय

स्पर्धेतील विजेत्यांना आयोजकांतर्फे तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेतील सुरुवातीचे महत्त्वाचे सामने आणि उपउपांत्य फेरीपासूनचे सामने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपित करण्यात येणार असल्याने राज्यभरातील कॅरमप्रेमींना स्पर्धेचा थरार घरबसल्या अनुभवता येणार आहे.

 

सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

पुरुष एकेरी गटाचे सामने शनिवार, २३ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खेळविण्यात येतील. तर महिला एकेरी गटाचे सामने रविवार, २४ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहेत.


Post a Comment

0 Comments