'टॅक्स सही है प्रीमियर लीग (टीपीएल) – सिझन
३'
महिला गटात स्नेहा पाटीलच्या
स्टार्टअप स्ट्रायकर्सला तर पुरुष गटात गौरव अग्रवालच्या जीएसटी ग्लॅडिएटर्स विजेतेपद
इनडोअर क्रिकेट स्पर्धेत वियोम फाउंडेशन अजिंक्य!
'मोहसिन खान'च्या स्वाक्षरीच्या बॅट-बॉलने मानसी, सुधीर गुप्ता, सुमित
व ओमकार पाटोळेचा गौरव
मुंबई :
अंधेरीतील चित्रकूट टर्फवर
रंगलेल्या 'टॅक्स सही है प्रीमियर लीग
(टीपीएल) – सिझन ३' इनडोअर क्रिकेट स्पर्धेचा समारोप
क्रिकेटप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला. महिला अंडरआर्म (टीपीएल ३.२),
पुरुष अंडरआर्म (टीपीएल
३.०) आणि पुरुष इनडोअर क्रिकेट (टीपीएल ३.१) अशा तीन गटांमध्ये रंगलेल्या या
स्पर्धेत वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबने अंतिम
सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा तब्बल १२४ धावांनी धुव्वा उडवत विजेतेपदावर
दिमाखात कब्जा केला. संपूर्ण स्पर्धेत नेतृत्व,
फलंदाजी आणि रणनीतीचा
उत्कृष्ट संगम साधणाऱ्या कर्णधार ओमकार पाटोळे
याची
स्पर्धेतील
सर्वोत्कृष्ट खेळाडू (मालिकावीर) म्हणून निवड करण्यात आली.
तीन गट... तीन विजेते...
क्रिकेटचा जल्लोष;
महिला गट - 'स्टार्टअप स्ट्रायकर्स’ विजेता
पुरुष गटात ‘जीएसटी ग्लॅडिएटर्स’ची बाजी
वियोम फाऊंडेशनने इनडोअर क्रिकेट मध्ये रचला इतिहास
स्पर्धेतील पुरुष इनडोअर क्रिकेट (टीपीएल
३.१) गटात वियोम फाऊंडेशनने एकतर्फी वर्चस्व गाजवत बृहन्मुंबई
महानगरपालिकेचा पराभव केला.
ओमकारच्या झंझावाती खेळीने
सामन्याला कलाटणी
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून
बृहन्मुंबई
महानगरपालिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच
रुपेश
चुनेकर आणि ऋषिकेश जाधव
यांनी
श्रेयसला
तीन वेळा बाद करत वियोमच्या पहिल्या जोडीला अवघ्या
४
धावांवर रोखले. मात्र त्यानंतर
कर्णधार
ओमकार पाटोळे याने आक्रमक २० धावांची खेळी
करत डाव सावरला. त्याला
अश्विन
डोंगरे आणि प्रसाद आंब्रे
यांनी
२९
धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. शेवटच्या जोडीतील
अनिकेत
माडिये आणि रोहित खरात
यांनी
२६
धावा जोडत वियोम फाऊंडेशनला
७९
धावांचा भक्कम टप्पा गाठून दिला.
वियोमच्या भेदक
गोलंदाजीसमोर पालिकेची दाणादाण
८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना
बृहन्मुंबई
महानगरपालिकेचा फलंदाजी क्रम वियोमच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पूर्णपणे
कोसळला. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज सतत बाद होत गेले.
इनडोअर क्रिकेटच्या विशेष नियमांनुसार संघाचे
१७
फलंदाज बाद झाल्यामुळे ८५ धावा वजा झाल्या आणि पालिकेचा डाव
वजा ४५
धावांवर संपुष्टात आला. परिणामी
वियोम
फाऊंडेशनने तब्बल १२४ धावांनी दणदणीत विजय
मिळवत टीपीएल-३ चे विजेतेपद
पटकावले.
मालिकावीर ठरला ओमकार
पाटोळे
संपूर्ण स्पर्धेत शांत नेतृत्व,
आक्रमक फलंदाजी आणि अचूक
रणनिती यांचा अप्रतिम मिलाफ साधणाऱ्या ओमकार पाटोळे
याला
'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'
पुरस्काराने गौरविण्यात
आले. त्याच्या नेतृत्वाखाली वियोम फाऊंडेशनने साखळी
फेरीतील प्रत्येक सामन्यात १०० पेक्षा अधिक धावा
करत विजेतेपदाचा प्रबळ
दावेदार असल्याचे सिद्ध केले.
'मोहसिन खान'च्या स्वाक्षरीच्या
बॅट-बॉलने खेळाडूंचा सन्मान
स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरलेल्या
आयपीएल
वेगवान गोलंदाज मोहसिन खान यांच्या स्वाक्षरीच्या बॅट आणि बॉलने उत्कृष्ट
खेळाडूंचा गौरव करण्यात आला. महिला गटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल
मानसीला स्वाक्षरी केलेला बॉल
प्रदान करण्यात आला. पुरुष अंडरआर्म गटात सुधीर गुप्ता
याला
सर्वोत्कृष्ट
फलंदाज म्हणून स्वाक्षरीची बॅट, तर सुमित
याला
सर्वोत्कृष्ट
गोलंदाज म्हणून स्वाक्षरीचा बॉल देऊन सन्मानित करण्यात आले. तर इनडोअर
क्रिकेट स्पर्धेत ओमकार पाटोळेला मोहसिन खान
यांच्या स्वाक्षरीच्या बॅट
देऊन गौरवण्यात आले.
खेळ,
उद्योग आणि कर जनजागृतीचा अनोखा संगम
महामुंबई इनडोअर क्रिकेट
स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने एमजीए फाऊंडेशनने
आयोजित केलेल्या या
स्पर्धेने क्रीडा, कॉर्पोरेट नेटवर्किंग आणि कर जनजागृतीचा अनोखा संगम घडवून
आणला. असा अब्लॉय, आरडीसी कॉंक्रिट, एयू बँक व अँड्रोमेडा यांनी स्पर्धेला मोलाचे
सहकार्य दिले.
मान्यवरांच्या उपस्थितीत
बक्षीस वितरण
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ॲड. अमित
मेहता आणि आमदार हारून खान यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ॲड.
राजनारायण यादव (उपाध्यक्ष, भाजप उत्तर-पश्चिम जिल्हा,
मुंबई),
ॲड.
अवनीश तीर्थराज सिंग (अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा – काँग्रेस),
सीए
मनीष अग्रवाल (अध्यक्ष, एमजीए फाउंडेशन), बाळ तोरसकर (संस्थापक सचिव,
महामुंबई इनडोअर क्रिकेट
स्पोर्ट्स असोसिएशन), सीए महिमा अग्रवाल (उपाध्यक्ष, एमजीए फाउंडेशन), विनया तोरसकर (अध्यक्षा,
वियोम फाउंडेशन),
प्रमोद
पटोडिया (संस्थापक, चॉइस ग्रुप), पुरुषोत्तम यादव (उपाध्यक्ष,
समाजवादी पक्ष,
उत्तर-पश्चिम जिल्हा,
मुंबई) आणि सीए स्नेहा
पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित
केल्याबद्दल नीता, श्वेता, अकील,
दक्ष, आकाश मेहता (एटूएम मेडिया) आणि
संपूर्ण एमजीए फाउंडेशनच्या टीमच्या समर्पित प्रयत्नांची आयोजकांनी कौतुक केले.







Post a Comment
0 Comments