पनवेल शहर संघाची सुवर्ण झेप
३७ सुवर्णांसह जिल्हास्तरीय युनिफाईड स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले
१४ व्या रायगड जिल्हास्तरीय युनिफाईड स्पर्धेत दमदार वर्चस्व
सातारा राज्य स्पर्धेसाठी सुवर्णपदक विजेत्यांची निवड
सुवर्णपदकांचा अक्षरशः पाऊस
पनवेलने प्रतिस्पर्ध्यांवर गाजवले निर्विवाद वर्चस्व
पनवेल : रायगड
जिल्ह्यातील युनिफाईड क्रीडा चळवळीत पनवेल शहराने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध
केली आहे. चांगू काना ठाकूर विद्यालय, नवीन पनवेल येथे पार
पडलेल्या १४ व्या जिल्हास्तरीय युनिफाईड स्पर्धेत पनवेल शहर संघाने तब्बल ३७
सुवर्ण, १२ रौप्य आणि ५
कांस्य पदकांची कमाई करत
प्रतिस्पर्ध्यांवर अक्षरशः वर्चस्व गाजवले आणि प्रथम क्रमांकाची अजिंक्यपदाची
चॅम्पियनशिप ट्रॉफी दिमाखात आपल्या नावावर केली. स्पर्धेतील ही एकतर्फी
कामगिरी पनवेलच्या युनिफाईड खेळाडूंच्या मेहनतीची आणि प्रशिक्षकांच्या नियोजनाची
साक्ष देणारी ठरली.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा सुवर्ण ठसा
रायगड युनिफाईड असोसिएशनचे उपाध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुखापूर, विचुंबे, आदई, कळंबोली, तक्का आणि कामोठे परिसरातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षक सिद्धेश कदम, अनुज भोसले, सोहम सावंत,
वीरेश राठोड, दीपेश, वनराज आणि अनिकेत दुशिंग यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. त्याचाच
परिपाक म्हणून पनवेलच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट करत स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.
सुवर्णपदक विजेत्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड
या स्पर्धेतील सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची सातारा येथे
होणाऱ्या राज्यस्तरीय युनिफाईड स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र
युनिफाईड असोसिएशनचे सचिव मंदार पनवेलकर यांच्या हस्ते सर्व विजेत्या
खेळाडूंना पदके प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन प्रशांत
गांगर्डे यांनी केले.
३७ सुवर्णपदक विजेत्यांची चमकदार कामगिरी
सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये वर्णिका रेड्डी, वैष्णवी सावंत, रिद्धी गरुड,
क्रिधा भोसले, प्रिशा अंबरकर, श्रेयश गायकवाड, रुद्र भाईगडे, अमोघ दळवी, आरुष ठोंबरे, आरव
नायर, साई पठाडे, रिद्धी सुर्वे,
अद्विका गरगडे, निष्ठा चांदणे, अ. रुद्रा, आरुष कालेल, स्वरा
कालेल, हसन फारूक, अदिती मिश्रा,
रुद्राणी आडाव, जीनथ शेख, अलिशा तांबोळी, सोहम इंगळे, ओम
कोठावळे, आदर्श जयभय, संस्कार पवार,
अभिनव घाटविस, श्रीयान हजारे, सिद्धी हजारे, लक्ष यादव, खुशी
भोजने, अनिरुद्ध मुकणक, रेयांश गामिनी,
धृती रमेश, ऋषिकेश कुमार, अमोघ दळवी आणि आदेशित
चोगले यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी आपल्या गटात अव्वल कामगिरी करत
पनवेलला अजिंक्यपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
रौप्य व कांस्य विजेत्यांचीही दमदार साथ
रौप्यपदक विजेत्यांमध्ये स्वरा रामबडे, विनय ओझा, वेद परब, विवान सिंग, शौर्यवर्धन दांडी, इकरा तांबोळी, अदिथ अभिलाषा, पृथा
पाटील, स्वराज पाटील, प्रांजल बने,
शर्विल मिस्त्री आणि युवान
सिंग यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तर कांस्यपदक विजेते देवांश घाटविस, सागर मोहिते, सचिन चव्हाण,
आकाश चौधरी आणि प्रवेश
पाटील यांनीही पनवेलच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
राज्य स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष
जिल्हास्तरावर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर आता पनवेलच्या सर्व
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंकडून सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेतही
दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा स्पर्धेतील ही यशस्वी घोडदौड
कायम ठेवत राज्यस्तरावरही पनवेलचे नाव उज्ज्वल करण्यासाठी हे खेळाडू सज्ज झाले
आहेत.

Post a Comment
0 Comments